करिअर्सची लघुयादी तयार करा
यशस्वी होऊन आपल्या
कामाचा आनंद घ्या

चाचणीचे तपशील

 • • विभाग: 4
 • • कालावधी: 2.5 तास
 • • भाषा पर्याय : इंग्लिश/कन्नड
 • • शुल्क: रु. 1000 + टॅक्सेस

तुमची चाचणी कशावर आधारित होईल?

 • • विषय आधारित चाचणी
 • • नैसर्गिक क्षमता/कल चाचणी
 • • स्वारस्य असलेल्या करिअरची चाचणी
 • • व्यक्तिमत्व चाचणी.

तुमचा अहवाल

 • • प्रत्येक विभागाचे विश्लेषण असलेला
  खास 21 पानी अहवाल
 • • तुमच्या आवडी आणि कौशल्यावर आधारित
  तुम्हाला अनुकूल असलेले सर्वोत्तम ३ करिअर पर्याय.


विषय चाचणी:

हा विभाग आतापर्यंत आपण शाळेत जे शिकलात त्याचा परीक्षण करेल. आपल्याला आवडत असलेल्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात कारकीर्द सुरू करण्यासाठी आपण कोणत्या विषयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे याबद्दल ह्या विभागाचे परिणाम आपल्याला अंतर्दृष्टी देतात.

नैसर्गिक क्षमता/कल चाचणी:

नैसर्गिक क्षमता/कल चाचणी परिणाम आपण ज्यात नैसर्गिकरित्या चांगले आहेत ते दर्शविते. नंतर आपण करियर पर्यायांकडे पाहू शकता ज्यात आपल्याला नैसर्गिकरित्या चांगले कौशल्य आहे.

स्वारस्य / आवडींबाबत चाचणी:

असे काही प्रकारचे व्यवसाय / कार्ये आहेत जी आपल्यासाठी नैसर्गिकरित्या आकर्षक दिसू शकतात. ही चाचणी विविध कार्यांची अशी सूची तयार करते, ज्याचा तुम्ही सर्वाधिक आनंद घ्याल. .

व्यक्तिमत्व चाचणी:

विद्यालयामध्ये तुमचे व्यक्तिमत्व नुकतेच खुलायला लागलेले असते. तुमचे व्यक्तिमत्व आयुष्यातील विविध अनुभवांनुसार बदलू शकते. तुम्ही या निकालांचा वापर करिअरचे विविध पर्याय निवडण्यासाठी करू शकता, जेथे तुम्हाला .उच्च दर्जाच्या कामाचे समाधान मिळू शकेल.हे महत्वाचे आहे का?


"होय, ही चाचणी गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या करियर आणि स्वारस्यावर आधारित आपल्यासाठी योग्य असलेल्या करियर पर्यायांची निवड करण्यास आपल्याला मदत होईल. कसे? ही चाचणी तुमची
कौशल्ये, आवडी, नावडी आणि बौद्धिक पातळीवर आधारित सर्वोत्तम शैक्षणिक आणि करिअर पर्याय प्रदान करते."

या चाचणीचा कालावधी काय आहे? मी टी एका बैठकीत देणे अपेक्षित आहे का वेगवेगळ्या दिवशी देऊ शकतो?
ही चाचणी पूर्ण करायला साधारण २.५ तास लागतील. आम्ही तुम्हाला असे सुचवू इच्छितो की एकाच दिवशी तुम्ही ही चाचणी पूर्ण करावी. तरीसुद्धा तुम्हाला पर्याय उपलब्ध आहे की, ह्यातील प्रत्येक विभाग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या दिवशी कधीही सोडवू शकता. तुम्ही मध्ये विश्रांती घेऊ शकता आणि प्रत्येक विभागाकडे विविध दिवशी लक्ष देऊ शकता. एकदा का तुम्ही प्रत्येक विभाग सादर केलात, की तुमची उत्तरे सेव्ह केली जातात. त्यामुळे त्याच विभागाला पुन्हा भेट द्यायची गरज नाही. तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण अहवाल पाहिजे असल्यास तुम्ही पूर्ण चाचणी देणे आवश्यक आहे.
मी चाचणीसाठी नोंदणी कशी करू शकतो आणि पैसे कसे भरू शकतो?

विद्यार्थी डेबिट/क्रेडीट कार्ड / नेटबँकिंग सुविधा वापरून ऑनलाईन पैसे भरू शकतात.
चाचणी देण्याआधी मला पुर्व्तायातीची गरज आहे का?

चाचणी देण्यासाठी कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही. या चाचणीची रचना तुमची सद्यकाळातील ज्ञानाची पातळी, आवडी, नैसर्गिक क्षमता आणि व्यक्तिमत्व यांचे मूल्यांकन करण्यासाठी केली आहे.
चाचणीचा प्रत्येक विभाग महत्वाचा आहे? का मी काही विभाग सोडू शकतो?
चाचणीचे सर्व विभाग महत्वाचे आहेत. जे विद्यार्थी ही चाचणी गंभीरतेने घेतात त्याचे अहवाल अधिकअचूक आणि त्यांची आवड व क्षमतेला जुळणारे असल्याचे जाणवेल.


Explore career options through our blogs